Card image cap
july 2, 2023
नाशिक रोड आय एम ए तर्फे डॉक्टर्स डे निमित्त सत्कार सोहळा संपन्न

डॉक्टर्स डे चे औचित्य साधून आय एम ए नाशिक रोड तर्फे जेष्ठ डॉक्टरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या भव्यदिव्य समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात हे उपस्थित होते. नाशिक रोड आयएमए अध्यक्ष डॉ स्वप्नांजली आव्हाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीबद्दल माहिती दिली. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व आयुष्यभर रुग्णसेवेत स्वतःला झोकून देणाऱ्या पाच जेष्ठ डॉक्टरांना जीवन गौरव पुरस्कार व वैद्यकीय उत्कृष्टता पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित डॉक्टरांमध्ये नाशिकरोड येथील डॉ. सीताराम गावित, डॉ. सुभाष काळदाते, डॉ. विलास शिंदीकर, डॉ. प्रतिभा उप्पलवार यांचा समावेश आहे तर डॉ. नम्रता मित्तल यांना वैद्यकीय उत्कृष्ठता पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांचे गौरवपत्र लेखन डॉ. राजीव पाठक यांनी तर वाचन डॉ. राजेश्री पाठक यांनी केले. सन्मानार्थी डॉक्टरांनी त्याच्या वैद्यकीय कारकिर्दीत केलेल्या कार्याचा व आलेल्या अडीअडचणींचा उल्लेख करून उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन केले. डॉ क्षमा अघोर व डॉ तुषार देवरे यांनी सुरेल गाण्यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले.

प्रमुख पाहुणे डॉ. अशोक थोरात यांनी रुग्णांची काळजी घेताना डॉक्टरांनी स्वतःच्याही आरोग्याची काळजी घेणे किती गरजेचे आहे यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर अध्यक्ष डॉ. स्वप्नांजली आव्हाड यांनी शाखेच्या वेबसाईटचे अनावरण करून ती प्रक्षेपीत केली. सचिव डॉ महेश मांगूळकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राजीव पाठक व डॉ मानसी पाटील यांनी केले. यावेळी संघटनेचे पॅट्रन डॉ. कनोजीया, उपाध्यक्ष डॉ. सुनीता देवरे, खजिनदार डॉ सुष्मा भूतडा, सहसचिव डॉ सुशांत जाधव, सहखजिनदार डॉ हनुमंत गिरी व नाशिकरोड येथील अनेक मान्यवर डॉक्टर्स उपस्थित होते.


Card image cap
Jan 24, 2020
नाशिक रोड येथे आय. एम. ए. ची डॉक्टरांसाठी विशेष व्याख्यानमाला संपन्न

नाशिक रोड आय. एम. ए. कार्यकारणी द्वारा डॉक्टरांसाठी विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. नाशिक रोड आय. एम. ए. अध्यक्ष डॉ. स्वप्नांजली आव्हाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले व संघटनेच्या पुढील वाटचाली बद्दल माहिती दिली. प्रमुख वक्ते म्हणून नाशिकमधील सुप्रसिद्ध सर्जन डॉ. प्रमोद शिंदे यांनी हर्निया व त्यावर उपलब्ध असलेले नवीन प्रगतिशील शस्त्रक्रिया यावर विस्तृत व्याख्यान दिले. त्यानंतर सुप्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. मनोहर जाधव यांनी मोबाईल फोटोग्राफी एक छंद यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ विनीत वानखेडे व डॉ राजीव पाठक यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. व्याख्यानानंतर सचिव डॉ. महेश मांगुळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळेमध्ये कार्यकारिणीचे पदाधिकारी डॉ सुनीता देवरे, डॉ सुषमा भुतडा, डॉ सुशांत जाधव हे उपस्थित होते. तसेच डॉ कोमावार, डॉ सहस्रबुद्धे, डॉ पापरीकर, डॉ डुंबरे, डॉ राजदेरकर, डॉ कातोरे, डॉ सुराणा, डॉ कोलते, डॉ वाबळे, डॉ जगताप, डॉ पाटील, डॉ खैरनार, डॉ कुमट व इतर मान्यवर उपस्थित होते.


Card image cap
21 June 2023
इंडियन मेडिकल असोशिएशनच्या नाशिक रोड शाखेचा नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा

इंडियन मेडिकल असोशिएशनच्या नाशिक रोड शाखेचा नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच उत्साहात झाला. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरदकुमार अगरवाल अध्यक्षस्थानी होते. नवनियुक्त अध्यक्षा डॉ. स्वप्नांजली आव्हाड यांनी मावळते अध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा यांच्याकडून पदभार स्विकारला. नविन कार्यकारिणीत सचिव- डॉ. महेश मंगुळकर, खजिनदार डॉ.सुषमा भुतडा, उपाध्यक्ष डॉ. सुनीता देवरे, सहसचिव डॉ. सुशांत जाधव, सहखजिनदार- डॉ हनुमंत गिरी, डॉ. सारंग दराडे आदींनी पदभार स्विकारला. इंस्टालेशन कमिटीचे अध्यक्ष डॉ. कनौजिया यांना शाखेचे पॅट्रॉन म्हणून घोषित करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. जयेश लेले, डॉ. शिवकुमार उत्तुरे, राष्ट्रीय ऍक्शन कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. मंगेश पाटे, प्रदेश सचिव डॉ. संतोष कदम, खजिनदार डॉ. राजीव अगरवाल, माजी अध्यक्ष डॉ. अनिल पाचनेकर, डॉ रेश्मा गुप्ता प्रमुख पाहुणे होते. डॉ. अगरवाल यांनी राजस्थानमध्ये लागू केलेल्या आरोग्याचा अधिकार (Right to health) कायद्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. सुशांत जाधव यांनी आयएमए प्रार्थनेचे वाचन केले. डॉ. अरुण स्वादी व डॉ. अलका स्वादी यांनी सूत्रसंचालन केले. माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा, माजी सचिव डॉ. रेश्मा घोडेराव, डॉ. कोमावार, डॉ. सहस्रबुद्धे, डॉ. ज्योत्स्ना डुंबरे, डॉ. हांडा, डॉ. कऱ्हाडे, डॉ. प्रवीण जाधव, डॉ. मित्तल, डॉ. तुषार देवरे, डॉ. नितीन सुराणा, डॉ. मयुर सरोदे, डॉ. माणिकराव आव्हाड, डॉ. सुनंदा आव्हाड, डॉ. जुनागडे, डॉ. आनिल कानडे, डॉ. शीतल जाधव, डॉ. वाबळे आदी उपस्थित होते.


Card image cap
21 June 2023
इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे कार्यशाळा

नाशिक रोड : डॉक्टरांच्या कार्यशाळेप्रसंगी डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. स्वप्नांजली आव्हाड, डॉ. महेश मांगुळकर, डॉ. मनोहर जाधव, डॉ. नंदकिशोर कातोरे आदी. इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे कार्यशाळा नाशिक रोड : नाशिक रोड इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे डॉक्टरांसाठी कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्षा डॉ. स्वप्नांजली आव्हाड होत्या. या वेळी सर्जन डॉ. प्रमोद शिंदे यांनी हर्निया व त्यावर उपलब्ध असलेले नवीन प्रगतिशील शस्त्रक्रियेवर माहिती दिली. पॅथॉलॉजिस्ट डॉ. मनोहर जाधव यांनी मोबाईल फोटोग्राफी एक छंद यावर मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. विनीत वानखेडे, डॉ. राजीव पाठक यांनी परिचय करून दिला. सचिव डॉ. महेश मांगुळकर यांनी आभार मानले. कार्यशाळेत डॉ. सुनीता देवरे, डॉ. सुषमा भुतडा, डॉ. सुशांत जाधव, डॉ. कोमावार, डॉ. सहस्रबुद्धे, डॉ. पापरीकर, डॉ. डुंबरे, डॉ. राजदेरकर, डॉ. नंदकिशोर कातोरे, डॉ. सुराणा, डॉ. कोलते, डॉ. वाबळे, डॉ. जगताप, डॉ. पाटील, डॉ. खैरनार, डॉ. कुमट आदींनी सहभाग घेतला.